संस्थेचे कार्य

सुसंस्कृत नागरिक हाच राष्ट्राच्या संपन्नेतचा आधार आहे! संस्कारसंपन्न नागरिकच समाजाला बलसंपन्न ठेवतात, उन्नतीकडे नेतात. संस्कारांची सुयोग्य सुरूवात हे त्याच्या यशाचे गमक आहे. हाच संस्थेच्या कार्याचा गाभा आहे.फलानुमेया प्रारंभाः या न्यायाने आज संस्थेच्या कार्याचा जो यशोविस्तार झाला आहे त्यामागे गेल्या पन्नास वर्षाहून अधिक काळ विविध ज्ञात-अज्ञात कार्यकर्त्यांनी, सुहृदांनी घेतलेल्या कष्टांचे अर्घ्य आहे.

सशक्त राष्ट्र घडवू या

मोतीबागेचा इतिहास


मोतीबाग ही सरदार बिवलकर यांची जागा. पूर्वी इथे मंगल कार्यालय होते. तिथे लग्न असले, की सर्वजण हसबनीस बखळीत एकत्र येत. नंतर संस्थेने ही जागा विकत घेतली. नाना पालकर यांनी लिहीलेल्या, बापूराव दाते यांनी संगीत दिलेल्या सुधीर फडके यांच्या आवाजातील दोन समरगीतांचे ध्वनीमुद्रण मोतीबागेत झाले. मोतीबाग पुनर्निर्माण प्रकल्प सुरू झाला आहे. भविष्यकाळ घडवणारी वास्तू उभी होत आहे. आपला सहभाग आपण नोंदवू शकता.

विश्व विभाग - गरुडभरारी आयाम


संस्थेच्या विश्व विभागा तर्फे विदेशी शिक्षणासाठी जाणाऱ्या विद्यार्थी व त्यांचे पालक यांना शुभेच्छा व मार्गदर्शन प्रद कार्यक्रम आयोजित केला. हा ४ तासांचा कार्यक्रम १० जुलै २०२२ रोजी आबासाहेब गरवारे महाविद्यालय येथे घेण्यात आला.

भारतीय संस्कृती संवर्धन संस्था आणि श्री स्वामी समर्थ, पुणे प्रस्तुत

सर्वोत्तम अभिजात साहित्य अभिवाचन या उपक्रमाचे पहिले अभिवाचन स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर जीवन दर्शन महानाट्य... ज्येष्ठ नाटककार मधुसूदन कालेलकर लिखित' सागरा प्राण तळमळला.." दिग्दर्शन : अनुपमा कुलकर्णी सूत्रधार : प्रियंका अभ्यंकर या द्वारे स्वातंत्र्यवीर सावरकरांचे कार्य जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत पोहोचविण्याचा मानस आहे. दिनांक : 8 जुलै 2026 संध्याकाळी 5 ते 8 स्थळ : मोतीबाग, पुणे या अभिवाचन कार्यक्रमासाठी आपली सर्वांची उपस्थिती प्रार्थनीय आहे.

Contact Us



संपर्क / Contact us

भारतीय संस्कृती संवर्धक संस्था, ३०९, मोतीबाग, शनिवार पेठ, पुणे - ४११०३०.

दूरध्वनी - ०२०-२४४५८०८०

ईमेल पत्ता - karyavah@bharatiya3s.org

प्रताधिकार © भारतीय संस्कृती संवर्धक संस्था, ५१२३ (इसवी सन २०२१)। सर्वाधिकार सुरक्षित। सर्वे भवन्तु सुखिनः। भारतवर्षेण निर्मितः।